Collective Study at Deekshabhoomi 13 Sept. 2015


समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे  सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- 1) Why I Like Buddhism (DBAWS Vol. 17 Part 3 Page No. 515 )
2)  अस्पृशांचे धर्मांतर आणि त्यांचे राजकीय हक्क (DBAWS Vol.20 Page No. 200 )
जय भिम …
दि. १३ सप्टेंबर  २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर  येथे समता सैनिक  दलाच्या वतीने  “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे  सामूहिक चर्चात्मक अध्ययन ”  घेण्यात आले. या अंतर्गत “1) Why I Like Buddhism (DBAWS Vol. 17 Part 3 Page No. 515 ) आणि 2)  अस्पृशांचे राजकीय हक्क आणि धर्मांतरण (DBAWS Vol.20 Page No. 200 ) या विषांवर सामूहिक रितीने चर्चात्मक अभ्यास करण्यात आला .
खालील मुद्दे विस्तृतपणे अभ्यासिले व निष्कर्षीले :-
Why I Like Buddhism :-
१)    बुद्धा चा धम्म हा मनुष्यमात्रास आवशक असलेली प्रमुख तीन तत्त्वे, १. प्रज्ञा २. करुणा आणि ३. समता  या नीतीमूल्यांची शिकवण देतात मात्र इतर धर्म, ईश्वर, आत्मा आणि मृत्यू नंतर चे जीवन इत्यादी बाबतीत मनुष्यमात्रास गुंतवून ठेवतात.
२)    बाबासाहेब हे पटवून सांगतात कि Buddhism हा Karl Marx च्या तत्वप्रणाली पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे , कारण कसलाही रक्तपात न करता वैचारिक क्रांतीतून समाज परिवर्तन करता येऊ शकते आणि मानव कल्याणकारी  राजकीय शाशन व्यवस्था चालविता येऊ शकते.
अस्पृशांचे धर्मांतर आणि त्यांचे राजकीय हक्क :-
१)    आरक्षण हे धर्मावर आधारित नसून शेड्यूल कास्ट (SC ) मध्ये समाविष्ट असलेल्या जातींच्या यादीनुसार आहे आणि या जातींचा धर्माशी काहीही संबंध नाही. कारण अस्पृश हे वर्ण व्यवस्थे च्या बाहेर असल्यामुळे ते कधीही हिंदू नव्हते.
Caste means a social class separated from others by distinctions of hereditary rank, profession or wealth.

२)    १९३५ च्या कायद्यानुसार :-
अ) पहिले कारण असे कि शेड्यूल कास्ट (SC ) ची व्याख्या देतांना हिंदू धर्मांतर्गत जाती असा उल्लेख कायद्यात कोठेच केलेला नाही
ब) दुसरे कारण असे कि ज्या सर्वसाधारण मतदार संघामध्ये अस्पृशांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या सर्वसाधारण मतदार संघामध्ये दाखल होण्यास ज्या अटी कायद्याने घातल्या आहेत त्यात हिंदु धर्माचे अनुयायित्व नव्हे तर कोणत्याही धर्माच्या अनुयायीत्वाची आवश्यकता सांगितलेली नाही
क) तिसरे कारण असे कि, अस्पृश वर्गाला ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या हिंदुच्या वाट्यातून दिलेल्या नसून सर्वसाधारण जनतेच्या वाट्यातून दिलेल्या आहेत.
परंतू हिंदू लोकांनी शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये समावेश केलेल्या जातींनी हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहिले तरच त्यांना राखीव जागांचा फायदा घेण्यात येईल असे जे म्हणतात त्यांनी एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असावे असे आम्हास वाटते. आमच्या मते या जातीतील लोकांना राखीव जागेचा जो फायदा देण्यात आलेला आहे तो त्या जातीतील मतदारांच्या धार्मिक निष्ठेवर नसून मतदारांच्या जातीत्वावरच आधारलेला आहे.जातीय निवाड्याने सामान्य मतदार संघात जे वर्ग किंवा जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या पैकी काही विशिष्ट जाती निवडून काढून त्यांचा एक गट बनविला आहे आणि त्या गटाला शेड्यूल कास्ट (SC) असे नाव देवून त्या गटासाठी सामान्य मतदार संघाच्या वाट्यास आलेल्या जागांपैकी काही ठराविक जागा त्यांच्या करिता राखून ठेविल्या आहेत.

इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी  खालील भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.००  दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !

समता सैनिक दल.
(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)

13 Sept 15 3 13 sept. 15 1 13 Sept. 15 2 13 Sept. 15 4

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *