समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- Constitution of Samata Sainik Dal (DBAWS Vol. 17 Part 3 Page No. 566)
जय भिम …🙏
दि. 06/09/ 2015 ला दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Constitution of Samata Sainik Dal” यावर सामूहिक रितीने अभ्यास करण्यात आला . प्राथमिक स्वरूपाची माहिती आणि आजच्या परिस्थित्त SSD ची असणारी नितांत गरज आणि त्या अनुषंगाने तिची संविधानात्मक पुनर्बांधणी यावर चर्चा करण्यात आली.
खालील मुद्दे विस्तृतपणे अभ्यासिले व निष्कर्षीले :-
1) समाज आजघड़ीला ज्या उध्वस्त अवस्थेतुन जातांना दिसतो आहे त्यावर समता सैनिक दलाची मजबूत बांधणी करणे आणि त्यायोगे समाज संघटित करणे हाच एकमेव उपाय असू शकतो.
2) रिपब्लिकन तत्वज्ञानाशी बांधीलकी हा आमच्या चळवळीचा अविभाज्य अंग होय.
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !