१०/०५/२०१७ तथागत गौतम बुद्ध यांची २५६१ वी जयंती निमित्त SSD तर्फे प्रशिक्षण शिबीर, कल्याण


दि.१० मे २०१७ रोजी तथागत गौतम बुद्ध यांची २५६१ वी जयंती निमित्त पंचशिल बहुउद्देशिय विकास मंडळ कल्याण (पुर्व) यांच्या वतीने सर्व सामान्यापर्यत मातृसंघटनेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी समता सैनिक दलाने प्रशिक्षण शिबीर (कॅडर कॅम्प) आयोजित केले होते.

या प्रशिक्षण शिबिरास प्रमुख मार्गदर्शन आयु. मेघराज काटकर सर, चंद्रपूर यांनी केले.

प्रशिक्षण शिबिराची सुरूवात आपली  नेमकी चळवळ कोणती? या प्रश्नापासुन करण्यात आली व त्यावर स्पष्टपणे मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आपल्या मुक्तीदाता पित्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वारसा हक्कांनी दिलेल्या संघटना कोणत्या ? यावर पूर्णतः प्रकाश टाकण्यात आला, व त्या संघटनांच्या घटना किती उच्चकोटीच्या आहेत व त्यांची अंमलबंजावणी प्रत्येक धर्मान्तरीत बौद्ध बांधवाचे आद्यकर्तत्व आहे हे पटवून दिले. जगातील उत्कृष्ट अशी रिपब्लिकन तत्वप्रणाली RPI च्या घटनेच्या माध्यमातून सविस्तरपणे मांडण्यात आली. RPI हे संघटन किती महत्त्वाचे आहे हे त्यातून पटवून दिले तसेच SSD ची प्रतिज्ञा, कार्यकर्ता व समाज ह्यांची जबाबदारी, गटांना संकुचित करणे/ निष्प्रभ करणे ह्यावर संक्षिप्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिक दिपक हिवराळे, सैनिक- पुष्पलता हिवराळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमात प्रमुख स्थानिक उपस्थिती म्हणुन रंजना दाभाडे, विजया मेश्राम, जितेंद्र  दाभाडे,आनंदा पगारे, जितेंद्र भोसले, रमेश कांबळे,आनंद जाधव, ज्ञानेश्वर हिवाळे, रुपेश भोसले आणि सर्व कल्याण परिसरातील नांदिवली व अडिवली तेथील कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच महिला-पुरुष, तरुण मिळून 140 जणांचा सहभाग होता.

समता सैनिक दलाचे मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते सैनिक-प्रविण पवार, अरियं बौद्ध व पालघर चे प्रशांत खरात यांची विशेष उपस्थिती लाभली.

समता सैनिक दल
H.Q- दिक्षाभूमी, नागपूर
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *