💥 बुद्ध तत्वज्ञान स्पर्धा परीक्षा-2016, विषय-1 (बुद्ध कि कार्ल मार्क्स) संपन्न💥
रिपब्लिकन चळवळीच्या (SSD, RPI & The BSI) पुनर्बांधणी साठी कटिबद्ध असलेल्या समता सैनिक दलाच्या युवा आणि तडफदार कार्यकर्त्यांनी समाजातील तरुणांना बुद्ध तत्वज्ञानाचे महत्व कळावे जेणेकरून डॉ. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ तत्वप्रणालीचे योग्य आकलन होईल या उदात्त हेतूने अखिल भारतीय स्तरावर आयोजित केलेल्या बुद्ध तत्वज्ञान स्पर्धा परीक्षा-2016 च्या अंतर्गत दि. 31 जुलै 2016 रोजी, रविवार ला घेण्यात आलेल्या ‘ बुद्ध कि कार्ल मार्क्स’ या प्रथम विषयाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. संबंधित परीक्षेचे केंद्र नागपूर, चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, पुणे, रायगड,मुंबई व मुंबई- उपनगरे इत्यादी होते. सदर परीक्षेचे आयोजन करण्याकरिता अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे तसेच इतरही सहकारी मित्रांचे, विद्यार्थ्यांचे SSD, HQ, दीक्षाभूमी, नागपूर व मुंबई तर्फे शतश: धन्यवाद ! 💐💐💐👮
द्वारा,
समता सैनिक दल.
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org