शिकवा!चेतवा!आणि संघटीत करा!
Educate!Agitate & Organize.
मिञानो,
आपल्या समाजातील नेते मंडळी हि गेलील 60 वर्षांत गल्ली-बोळात, रस्त्यावर निर्माऩ झाली आणि गल्ली-गल्ली बोळातच त्यांचे राजकारण संपुष्टात आले. कारण जो पण चवताळुन उठला आणि आक्रोश करून पेटुन उठला, त्यांनी बाबासाहेब वाचलेच नाही, समजलेच नाही म्हणुन वाट भटकले किंवा संपला हेच आज पर्यत आमच्या समाजातील राजकिय चित्र दिसते.
☀समता सैनिक दलाने आपल्या समाजाचे राजकीय अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी डॉ.बाबासाहेबांनी दिलेली वारसा शिक्षण संस्था, परत चालु करत आहे, कारण आपल्या चळवळीविषयी निष्ठा निर्माण व्हावी,आमचे राजकारण हे नितीचे आणि लोकशाही पद्धतीने चालावीत.
आम्हाला नेत्यांची पार्टी न ठेवता, पार्टीचे नेते निर्माण करून , RPI ची जुनी गौरवशाली ओळख बहाल करावयाची आहे…
☀समता सैनिक दल संलग्न रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडिया यांच्या अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापक राजकीय स्कुल चालु करत आहोत.
👉नाव:-
🇮🇳Training School for Entrance to Politics.🇮🇳
☀भारतीय संविधानाने अंगिकारलेल्या संसदिय प्रणालीतील केंद्रिय आणि प्रांतीय कायदेमंडळातील प्रतिनिधिचे व्यक्तीमत्व शील आणि प्रज्ञायुक्त असावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती.
देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामात्मक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित “रिपब्लिकन “पक्षामध्ये तरूणांची भरती होत राहावी,ह्या हेतुने राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ इच्छिणार्या लोकांसाठी
💡मुंबई येथे, दि. २६ जानेवारी २०१६ साली, ह्या Republic Day ला, Republicans परिवारा तर्फे Republicans जनतेस ,राजकीय प्रशिक्षण स्कुल सुरु करण्यात येत आहे.
💐💐🇮🇳💐💐
👉 जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्त्वांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व प्रशिक्षण देण्यात येईल.
राजकारणाला योग्य वळण लावण्यासाठी नेता हा तज्ञ, लायक, कर्तूत्ववान असा आमदार आणि खासदार तयार करून, विधिमंडळात आणि लोकसभेत पुरवठा केला जाईल.
👉संसदीय संस्थेमध्ये सभागृहात आपल्या नेता कार्यक्षम, योग्य विचारसरणी,सौम्य अथवा तीक्ष्ण तर्कशुद्ध आणि माहीतीपुर्ण भाषणाने जो सभासद समाजाचा, लोकांचा मुद्दा(प्रश्न) मांडुन सर्वाना भारावुन टाकु शकतो, तोच सभासद यशस्वी होऊ शकतो.
☀ या प्रशिक्षणांत राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदिय कामकाजाविषयी नियम प्रणाली आणि पंरपंरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर वक्तृत्वसाधनेला प्राधान्य दिले जाईल.
———+++++——–
💡””TRAINING SCHOOL FOR ENTRANCE TO POLITICS””💡
( Dr.B.R Ambedkar written,Writings & Speeches, Volumes- 20.Page-462.)
पात्रता:-
१) व्यक्ती भारतीय असली पाहिजे.
२) १८ वर्ष पुर्ण वय मर्यादा.
३) राजकरणात रूची असणे आवश्यक तसेच RPI वर निष्ठा असणे गरजेचे आहे.
४) RPI च्या सात मौल्यवान सर्व जगात श्रेष्ठ तत्त्वांसाठी काम करण्यांची तयारी व ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करणारा.
५) तो समता सैनिक दलाचा सदस्यत्व असावा.
६) तो कोणत्याही प्रकारचे व्यंसनाधीन व गून्हेगार नसावा.
७) कमीत-कमी १२ वी ते १५ वी पास असावा.
समता सैनिक दल. मुंबई.
(www.ssdindia.org)
निलेश कदम.
08655582188.
मंगेश वानखडे.
09324127909.
( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द)