Unite under the one Banner


बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघठनेला सशक्त करणे ही सर्वांचीच जवाबदारी आहे…

डॉ.बाबासाहेब आम्बेडकरानी आपल्या हायतित समता सैनिक दल, स्वतन्त्र मजूर पक्ष शे.का.फे. भा.बौ.म.स. आणि रिपाई असे बरेचशे संघठन निर्माण केले. आणि त्या सर्वच संघठनेनि त्या त्या काळात अप्रतिम लढ़े लढ़ले व जिंकले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर त्या संघठनेची काय हाल झाले हे सर्वाना माहित आहेच.मग ते ससैद असो किंवा इतर संघठना. पण ससैद चा इतिहास जर पाहिला तर असे लक्षात येते की ह्या संघठनेने बाबासाहेब आम्बेडकरांचे सर्वच लढ़े पुढे राहून लढले.ससैदचा प्रत्तेक मार्शल आपल्या तळहातावर जिव घेवून तैयार राहयचा. पण गेल्या काही वर्षात ससैद कड़े समाजाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत ससैद ची ताकत इतकी होती की सामाजाकडे वाईट दृष्टीने बघण्याची हिम्मत कुणी करत नसे. व आज आपन असे बघतो की दररोज आपल्या माय बहिनिवर अत्याचार होत आहेत.कारन फ़क्त एकच…समाज संघठित नाही आणि आपला युवक दिशाहीन जीवन जगत आहे. त्याच्या मनात समाजाबद्दल आपुलकि तर आहेच पण विशिष्ठ परिस्थितिमधे इश्यूज ला कसे सामोरे जावे याचे ज्ञान नसल्यामुल सोशल मिडियावर आपला रोष व्यक्त करताना दिसतो.

आता गरज आहे युवकांच्या त्या रोशाला संघठित करण्याची. नाहीतर हे आशे भ्याड हल्ले थांबनारे नाहीत हे लक्षात घ्यावे. जेंव्हा जेंव्हा समजावर जातिखोर हल्ले होतात तेंव्हा तेंव्हा युवकांचा रोष उफाळतो आणि पाण्यावर आलेल्या बुलबुल्या सारखा फूटून पुनः जैसे थे वैसे होतो. जो पर्यन्त आपण समाजाची ऊर्जा streamline करणार नाही, जो पर्यन्त आपले लढ़े हे सुनियोजित आणि परिपक्व बनवनार नाही, तो पर्यन्त आपला राग आणि ह्रदय कम्पन अशेच व्यर्थ जाणार हे निश्चितच… ह्या सर्व धुमस्कळी मधे ससैद ची जिम्मेदारी आणि महत्त्व कीती आहे हे समजाने समजायला हवे.

गेल्या 65 वर्षात आपन हजारो संघठना उभ्या केल्यात आणि त्या संघठना इतिहासात जमा पण झाल्यात कारन काही का असेना. पण एक संघठन 1926 पासून आज पर्यन्त जिवंत आहे आणि ते म्हणजे समता सैनिक दल…कारण ह्या संघठनेला बाबासाहेब आम्बेडकरांसारखा विश्वमान्य विचार लाभलेला आहे. आपल्या सर्वांची लढाई ही बाबासाहेब आम्बेडकरानी दखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर असल्या मूळ त्यानी स्थापित केलेल्या संघठन्नाना म्हणजेच ससैद भारतीय बौद्ध महासभा आणि रिपाई ला सशक्त करण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे. एक भीम सैनिक…

FB – Adv. Mahendra Jadhav.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *