रिपब्लिकन पक्षाचा सोनेरी इतिहास
3 ऑक्टोबर 1957 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे ठरले. म्हणजेच 1957 साली रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिपब्लिकन पक्ष स्थापन करताना त्या पक्षाच्या पहिल्या अध्यक्षपदाचे दावेदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्यात नेतृत्वाखाली शे.का.फे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाला होता. महाराष्ट्रात त्यांच्याच नेतृत्वाखाली फेडरेशनने 1957 सालच्या लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या आणि महाराष्ट्रातुन सहा खासदार एकाच वेळी निवडून आणले होते. 1958 – 59 मध्ये पक्षातर्फे भुमिहीनांचा एक मोठा सत्याग्रह झाला. भूमिहीनाचा लढा हा काही विशिष्ट जाती – जमातीसाठी नव्हता तो सर्व जमातीतील भुमिहीनासाठी होता भुकेच्या वेदना या काही जाती – जमातीच्या नाहीत तर त्या साऱ्यांच्याच आहेत पोटातील भुक जात धर्म पाहत नाहि ती सारखीच असते दारिद्रय व बेकारीमुळे भूमिहिन जमीन मागतो आहे म्हणुन या देशातील पडीत जमीन वहिवटीसाठी भूमिहीन शेतकऱ्याना द्या असे कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणत किती तरी दलित भूमिहीन होते सरकारच्या पडीत जमिनी या भूमिहीनाना द्याव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे कर्मवीर दादासाहेबाच्या नेतृत्वाखाली जो सत्याग्रह झाला तो महाराष्ट्रातील एकमेव सत्याग्रह म्हटला पाहिजे जवळजवळ चार लाख सत्याग्रही तुरुगांत गेले तुरुग अपुरे पडले कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचे काय असा रोखठोख सवाल कर्मवीर दादासाहेबांनी त्यावेळचे कॉग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांना केला. भूमिहीनाचा हा सत्याग्रह साऱ्या महाराष्ट्रात दोन वर्षे चालला. पण कर्मविर दादासाहेब मागे हटले नाहित पडीत जमिनी जर भूमिहीनाना दिल्या तर देशातील अन्नधान्य संकट दुर होईल बेकारीचा भस्मासूर गाडला जाईल दुसऱ्या राष्ट्राकडे अन्नधान्यासाठी हात पसरावे लागणार नाहित राष्ट्रहितासाठी भूमिहीनांच्या सत्याग्रहातील मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे असे कर्मविर दादासाहेब गायकवाड यांना वाटे भूमिहिनांच्या अपूर्व यशाबदल सांगताना कर्मवीर म्हणायचे भूमिहिनाचा सत्याग्रह सर्वजाती धर्मातील भूमिहिनाचा असल्याने सर्व पक्षातील आणि धर्मातील नेते मंडळी या सत्याग्रहास पाठिबा देत होते कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा कायदेभगन होता झालेला हा अपूर्व लढा कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या जीवनातील कधीही न पुसणारा शीलालेखच म्हणावा लागेल.
-रणधीर जाधव.