:: देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती ऊत्सव समारोह २०१५ ::
समता सैनिक दल, रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन आणि मिडिया पार्टनर आवाज इंडिया टी. वी. Channel
यांच्या वतीने दि. ३० मार्च २०१५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपासून, देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती ऊत्सव समारोहाचे आयोजन वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती. समता सैनिक दलाच्या वतीने आयु. प्रशिक आनंद, आयु. विशाल नंदा, आयु. सिद्धार्थ पाटील तसेच भिक्खु बोधीपला, कोलकाता यांनी आपआपले विचार मांडले.
भिक्खु. बोधीपाल तसेच आयु. सिद्धार्थ पाटील यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच सम्राट अशोकांची रिपब्लिकन राज्याची कार्यपद्धती हि जनकल्याणार्थ असल्यामुळे तो भारताचा खरा सुवर्णकाळ होता हे विशद केले. आयुष्यामती. अंकिता लोखंडे हिने आपल्या गोड आवाजात श्रोत्यांना मंत्रमुग्थ करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आयु. प्रशिक आनंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजास वारसा हक्काने मिळालेल्या तीन संघटना म्हणजेच समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी व भारतीय बौद्ध महासभा यांचा मिळून बनणारा रिपब्लिकन परिवार यांनी एकत्रितपने हातात हात घालून सहकार्य व साहचर्याने, एकामेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करूनच बाबासाहेबांची चळवळ पुढे नेवून या देशाला प्रबुद्ध भारत बनविणे शक्य आहे, याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग असूच शकत नाही असे परखड मत ठामपणे समाजापुढे मांडले.
आयु. विशाल नंदा यांनी सम्राट अशोकाचे चरित्र, त्यांचा आदर्श भारतीय तरुणांनी घेणे अतिशय गरजेचे आहे यावर मत मांडले.
दिग्दर्शक आयु. चौधरी(BICEMRC) लिखित सम्राट अशोकांवर आधारित नृत्य नाटिका “पत्थर बोल ऊठे” यांचा प्रेक्षकांनी मनमुराद आस्वाद घेतला. अश्याप्रकारे कार्यक्रमास समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने आभारप्रदर्शन आयु. अमित मेंढे यांनी केले. अश्याप्रकारे कार्यक्रम यशश्वीरित्या पार पडला.
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)
(Very Important Note : Samata Sainik Dal, Republican Party and The Buddhist Society of India togetherly constitute the REPUBLICAN FAMILY. These are all the integral parts/members of this family.)