समता सैनिक दलाचा उस्मानाबाद येथील कार्यक्रमात विशेष सहभाग💥
रविवार दि. 17 जानेवारी 2016 रोजी, उस्मानाबाद शहरातील सुशिक्षित आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी प्रबुद्ध इंजिनिअर्स असोशिएशन च्या वतीने यशराज लॅान, उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने समाजातील विविध गटातटात विखुरलेल्या सर्व संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, प्रतिनिधी ज्यात मुख्यत्वे बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी, RPI (A), RPI (कांबळे), RPI, भारिप-बहुजन महासंघ,पीपल्स रिपब्लिकन पार्टी, दलित पॅंथर, रिपब्लिकन सेना, बामसेफ (वामन मेश्राम), बामसेफ (बोरकर) आणि कास्ट्राईब संघटना, भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ इत्यादी संघटनांचा सहभाग होता. प्रत्येक संघटनेला सद्यपरिस्थितीत ‘बाबासाहेबांना अपेक्षित असलेली क्रांती : काल आणि आज तसेच भविष्यातील विविध संघटनांची समाजातील नानाविध पैलूंच्या दृष्टीने वाटचाल व दृष्टीकोन’ या विषयांवर त्यांची मते मांडायला सांगण्यात आले.
प्रत्येकांनी त्यांच्या-त्यांच्या संघटनेची त्याविषयी भूमिका मांडली. शेवटी समारोपीय भाषणासाठी आमंत्रित आयु. प्रशिक आनंद, समता सैनिक दल, HQ, दीक्षाभूमी, नागपूर यांचे सुमारे दोन तास संवादात्मक भाषण झाले. त्यात त्यांनी आंबेडकरी चळवळ राबविण्यासाठी बाबासाहेबांनी समाजास दिलेल्या तीन संघटना ( समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) आणि त्यांचे तीन संविधान याविषयी विस्तृत माहिती दिली. शिवाय त्या संघटनांच्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आमची काय प्रतिबद्धता असावी हेहि स्पष्ट केले आणि राजकीय संघटनेच्या अराजकीय मुळा मजबूत करण्यासाठी युवकांना सामाजिक बांधिलकी स्विकारण्यासाठी आवाहन केले. तेव्हा समता सैनिक दलाच्या माध्यमातून चळवळीचे कार्य हाती घेण्याचा तरुणांनी प्रण केला. कार्यक्रमास समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आयोजकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल आणि विविध संघटनांना एकाच विचारमंचावर बोलावून केलेल्या अभिनंदनीय कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.