” समता सैनिक दल ”
रविवार दि. 17 जानेवारी 2016, रोजी दीक्षाभूमी , नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले
” स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धती ” ( खंड 18 )
वरील विषयावर बाबासाहेबांनी आधुनिक भारताची लोकशाहीत्मक वाटचाल होत असतांना ते एकसत्तात्मक किंवा प्रजासत्तात्मक राज्य नसून प्रजा प्रतिनिधीसत्तात्मक आहे तेव्हा मतदारीचा हक्क विस्तृतपणे सांगितल्यावर जातवार प्रतिनिधी देतांना, ते किती असावेत आणि ते कोणत्या पद्धतीने मिळायला हवेत व त्याचे निकष कसे असावेत याविषयी खंबीरपणे भूमिका मांडलेली होती. याविषयी आपले मत मांडतांना बाबासाहेब हे सत्य सांगतात कि मतदार लोक आपला प्रतिनिधी निवडतांना उमेदवाराच्या योग्यतेकडे विशेष लक्ष न देता त्याच्या जातीकडे पाहून आपले मत देतात आणि यामुळे याचा फायदा नेहमीच ब्राह्मण लोकांनाच होत असतो कारण ब्राह्मण, ब्राम्हणेतर आणि बहिष्कृत या तिघांमध्ये, ब्राह्मण लोक स्वजातीय हितापोटी ब्राह्मण उमेदवारालाच आपले मत देतात आणि ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत लोक अंधश्रद्धेपायी, त्यांच्यावरील भक्तीपोटी स्वहितास बाजूला सारून ब्राह्मण उमेदवारासच मत देतात. या अहितकारक प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना जातवार प्रतिनिधी देणे अगत्याचे ठरते तसेच प्रतिनिधींच्या संखेच्या प्रमाणाचा पाया जातींच्या परस्पर संख्येवरच अवलंबून असावा. तेव्हा ‘जातीची संख्या व तिच्या गरजा’ या गोष्टीनुरूप प्रतिनिधींची संख्या ठरविण्यात यावी. परंतु असे दिसते कि मतदारीचा हक्क संकुचित करून जातवार प्रतिनिधीस विरोध करून सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या वर्गाचे स्वामित्व आहे त्या वर्गाचे स्वराज्यात आरोहण करून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांवर राज्य करण्यास मुबलक मोकळीक देणारी स्वराज्याची घटना त्यांनी सुचविलेली आहे. तेव्हा ती घटना त्यांच्याप्रमाणे न असता ती आमच्या सूचनेप्रमाणे असावी कि जेणेकरून ब्राह्मणेतर व बहिष्कृतांवर होणारे हे उच्चवर्णीयांचे राज्य टाळण्यास मदत होईल यास्तव इंग्रज सरकारने मदत करावी.
सामूहिक चर्चात्मक, अध्ययनाची वेळ, दर रविवारी सकाळी 9 ते 11,
स्थळ ..दीक्षाभूमी
www.ssdindia.org
शिकवा, चेतवा, आणि संघटित करा !
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.