२५ जून २०१७ भुसावळ रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न


💥 रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न.💥

रविवार दि. 25 जून 2017 रोजी धम्मशिल बौद्ध विहार, भुसावळ येथे रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांचे बौद्धिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आला. SSD, दीक्षाभूमी नागपूर येथून आयु. प्रशिक आनंद यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना प्रथम सत्रात “प्राचीन भारताचा इतिहास” व दुसऱ्या सत्रात “आपली नेमकी चळवळ कोणती” या विषयावर मार्गदर्शन केले. नुकत्याच आमदार निवास, नागपूर येथे दि. 4 जून 2017 रोजी रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी पार पडलेल्या सभेत घेण्यात आलेल्या ठरावांच्या अनुषंगाने ही वाटचाल करण्यात आली. यांत तरुणांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. यातील 15 कार्यकर्त्यांनी समता सैनिक दलात प्रवेश घेऊन रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध होऊन काम करण्याचा निर्धार केला.
मुंबई येथून 5, पुणे येथून 1 व नागपूर येथून 2 सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिक संजय बौद्ध व आयु. कांबळे सर तसेच इतरही अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य दिले.

द्वारा : समता सैनिक दल, भुसावळ
www.ssdindia.org
8329756064, 9763499797, 7719888472
(रिपब्लिकन पार्टीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *