15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न


💥 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥

दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास हस्तांतरित केलेल्या रिपब्लिकन चळवळीची माहिती दिली. रिपब्लिकन चळवळीत समाविष्ट असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा या संस्थांना बळकट केल्याशिवाय समाज संघटित होऊ शकणार नाही यांवर मार्गदर्शन केले. तेव्हा तरुणांनी या उदात्त कामात पुढाकार घेऊन चळवळीची सूत्रे सांभाळावीत, जबाबदारी घ्यावी.

समता सैनिक दलाचे कार्यकर्ते बौद्धिक प्रशिक्षणातून अधिकाधिक घडविण्यात यावे आणि रिपब्लिकन चळवळीचे धडाडीचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्यरत राहण्याची अत्यंत आवश्यकता याप्रसंगी प्रतिपादित केली. रिपब्लिकन चळवळीच्या मुख्य संघटनेस जीची तत्वप्रणाली  समस्त भारतीयांना प्रबुद्ध भारताकडे यशस्वी वाटचाल करण्याकडे घेऊन जाणारी आहेत त्या रिपब्लिकन पार्टीची पुनर्बांधणी करण्यासाठी कंबर कसून पुढे आले पाहिजे एवढेच नव्हे तर सद्यपरिस्थित बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या संघटना घराणेशाहीतुन मुक्त करून घटनात्मक लोकशाहीवर आधारित पुनर्बांधणी करण्यासाठी तिची सूत्रे समाजाने आपल्या हातात घेतली पाहिजे. यास्तव गवई यांच्या हुकूमशाहीद्वारे घराणेशाहीत बंदिस्त असलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हिला अग्रक्रमाने मुक्त करणे ही काळाची गरज आहे हे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. यांनातर आपली रिपब्लिकन चळवळ सशक्त करण्यासाठी तरुणांनी त्यात सहकार्य आणि साहचर्य करण्याचा प्रण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम पाझारे यांनी केले तर आयोजनकर्त्यांत आयु. अनमोल पेटकर, रविंद्र पाझारे  तसेच समता सैनिक दलाचे आयु. निकेश टेम्भुरने, प्रकाश वाळके इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल उपस्थितांचे आभार.
जय भीम

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *