SSD बौध्दिक प्रशिक्षण शिबीर संपन्न,उल्हासनगर २९ ऑक्टो. २०१७.


👮🏻 सविनय जयभीम,
मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्हा यांतील कार्यरत असलेल्या संघटकांना SSD च्या संबंधात बौद्धिक प्रशिक्षण देऊन एक बौद्धिक सशक्त प्रचारक सैनिक बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे.प्रशिक्षित असलेला संघटक हा आपल्या संघटन कौशल्याने तालुका, शहर ,गाव आणि शाखा या पातळीवर इतर सदस्यांचे बौध्दिक प्रशिक्षण घेण्यास सक्षम होईल.हाच यामागील उद्देश आहे. हाच उद्देश सार्थ करण्यासाठी काल रविवार,दिनांक 29/10/2017 रोजी सकाळी-10:30 वा.ते सायं 4:00 वा. पर्यंत सुभाष टेकडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सम्यक कोचिंग क्लासेस, कानसाई रोड, उल्हासनगर -4 या ठिकाणी बौद्धिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मुंबई जिल्हा व ठाणे जिल्हा संघटक उपस्थित होते .सै. सागर गरूड यांनी प्रथम संघटकांना आपल्या मूळ संघटनांचा प्राथमिक आढावा दिला आणि नंतर SSD चा प्रचार प्रसार कसा केला पाहिजे याचे बौद्धिक प्रशिक्षण दिले .

सै. अजय माळवे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत काही बाबी स्पष्ट केल्या.
सै. नितीन गायकवाड यांनी संघटकांच्या सभा महिन्यातून किमान 2 वेळेस झाल्या पाहिजे असे सुचविले.
सै.अभयादित्य बौद्ध यांनी शिस्ती संबंधित आणि सांस्कृतिक कलेविषयी विचार मांडले.
सै.अतुल लाटकर यांनी दलाला आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे आहे आणि ते उपलब्ध केले पाहिजे यासंबधीत विचार मांडले.
सै.अनिकेत कांबळे यांनी संपूर्ण कोंकण विभागात SSD चे काम जोमाने सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारली.
सै.विजय बनकर यांनी उत्तम संघटक तयार करूनच SSD चा प्रचार प्रसार होईल,असे विशद केले.
सै.सनी खरात यांनी सैनिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हाती घेतलीे आहे.
सै.प्रणय नगराळे, सै.सूचित सावंत,सै.रमेश भोसले या सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले .

📋 पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

📌 12 नोव्हेंबर-शारिरीक प्रशिक्षण,अंबरनाथ (जांभूळ).

📌 19 नोव्हेंबर-सैनिकांची कार्यशाळा,अंबरनाथ (जांभूळ शाखा).

📌 26 नोव्हेंबर-संविधान दिन,मुरबाड.

📌 5,6,7 डिसेंबर-शिवाजी पार्क (स्टॉल),स्वयंसेवा चैत्यभूमी, दादर.

📌 24,25 डिसेंबर -परेड,सलामी,संकलन याचे प्रशिक्षण-अंबरनाथ.

📌 1 जानेवारी-भीमाकोरेगाव (स्टॉल) आणि संकलन,पुणे.

सर्व नियोजन झाल्यावर दलाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समता सैनिक दल
( मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर)
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *