०९ सप्टें २०१७, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, यवतमाळ


💥 यवतमाळ येथे रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न💥

दि. 09/09/2017  रोजी, लॉर्ड बुद्धा टीव्ही सभागृह, बस स्थानक जवळ, यवतमाळ येथे आयु. नाईक सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयाच्या अनुषंगाने नागपूर येथून आलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी सर्वप्रथम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. चळवळीची ऐतिहासिक माहिती देऊन सोबतच उत्क्रांत होत गेलेली आपली चळवळ, रिपब्लिकन पार्टीच्या सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या आधारावर तिची बाबासाहेबांनी कशी पायाभरणी केलेली आहे हे उपस्थितांना पटवून दिले आणि अशी आशा व्यक्त केली की ज्या समता पर्व महिला बचत गट, यवतमाळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांची समता या बुद्ध तत्वज्ञानाला समाजात रुजविण्यासाठी असलेली जशी तळमळ आहे, धडपड आहे अगदी तशीच तळमळ त्यांना आता डॉ. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील दुखमुक्ती ची सात सर्वश्रेष्ठ तत्वे समाजात रुजविण्यासाठी देखील निर्माण व्हावी आणि रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी सहभाग नोंदवावा. तद्नंतर उपस्थितांशी प्रश्नोत्तरे-चर्चा करण्यात आल्या व त्यांची समाधानकारक उत्तरेही देण्यात आलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. अशोक इंगोले सर यांनी करून संयोजनाची सूत्रे आयु. नारायण थुल यांनी सांभाळली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आयु. नाईक सर यांनी रिपब्लिकन पार्टीची पुनर्बांधणी ही काळाची गरज आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयुष्यमती उज्वला इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या समता पर्व महिला बचत गट यांचे तसेच ऍड. रामदास राऊत, सुशील जांभुळकर आणि इतरही कार्यकर्त्यांचे आभार मानल्या गेले. चळवळीत नवतरुणांचा सहभाग कौतुकास्पद होता.

द्वारा: समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

(रिपब्लिकन पार्टी च्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *